आले हो आले गणपती बाप्पा

आले हो आले गणपती बाप्पा,
आले हो आले गणपती बाप्पा,
दाही दिशांना, दाही दिशांना,
गुलाल उधलू चला,
आले हो आले गणपती बाप्पा,
आले हो आले गणपती बाप्पा,
कशी रंगांची उधळण रस्त्यावर,
पोर दौलत नाचती तालावर,
कशी रंगांची उधलण रस्त्यावर,
पोर दौलत नाचती तालावर,
बोला मोरया हो मोरया,
बोला मोरया हो मोरया….

फुलांची बरसात करू चला,
आले हो आले गणपती बाप्पा,
आले हो आले गणपती बाप्पा,
जोडी जोडीत फुगडी रंगली ग,
अन वाद्यांची संगत जमली ग,
जोडी जोडीत फुगडी रंगली ग,
अन वाद्यांची संगत जमली ग,
आज जल्लोष, आज जल्लोष धुंडित सारेजन,
आज जल्लोष धुंडित सारेजन,
नच नाचुनी बेभान होउ चला,
आले हो आले गणपती बाप्पा,
आले हो आले गणपती बाप्पा….

दुमदुमक ढोल हा वाजला,
कसा चौघडा मधेच झनानला,
दुमदुमक ढोल हा वाजला,
कसा चौघडा मधेच झनानला,
सात सुरात, सात सुरात सनई नादावली,
सात सुरात सनई नादावली,
झांजले झिम मस्तीत खेलू चला,
आले हो आले गणपती बाप्पा,
आले हो आले गणपती बाप्पा….

दाही दिशांना, दाही दिशांना,
गुलाल उधलू चला,
आले हो आले गणपती बाप्पा,
आले हो आले गणपती बाप्पा…..

Author: Unknown Claim credit

Comments

संबंधित लेख

आगामी उपवास और त्यौहार

छठ पूजा

मंगलवार, 28 अक्टूबर 2025

छठ पूजा
कार्तिक पूर्णिमा

बुधवार, 05 नवम्बर 2025

कार्तिक पूर्णिमा
उत्पन्ना एकादशी

शनिवार, 15 नवम्बर 2025

उत्पन्ना एकादशी
मोक्षदा एकादशी

सोमवार, 01 दिसम्बर 2025

मोक्षदा एकादशी
मार्गशीर्ष पूर्णिमा

गुरूवार, 04 दिसम्बर 2025

मार्गशीर्ष पूर्णिमा
सफला एकादशी

सोमवार, 15 दिसम्बर 2025

सफला एकादशी

संग्रह