ॐकार स्वरुपा

ॐकार स्वरुपा, सद्गुरु समर्था,
अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो,
तुज नमो, तुज नमो, तुज नमो….

नमो मायबापा, गुरुकृपाघना,
तोडी या बंधना मायामोहा,
मोहोजाल माझे कोण नीरशील,
तुजविण दयाला सद्गुरुराया,
तुज नमो, तुज नमो, तुज नमो…..

सद्गुरुराया माझा आनंदसागर,
त्रैलोक्या आधार गुरुराव,
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश,
ज्या पुढे उदास चंद्र, रवी,
रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा,
स्वप्रकाशरुपा नेणें वेद,
तुज नमो, तुज नमो, तुज नमो…….

एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह,
तयाचे पै नाम सदा मुखी,
तुज नमो, तुज नमो, तुज नमो,
ॐकार स्वरुपा, सद्गुरु समर्था,
अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो,
तुज नमो, तुज नमो, तुज नमो…..

Author: Unknown Claim credit

Comments

संबंधित लेख

आगामी उपवास और त्यौहार

वैशाखी पूर्णिमा

शुक्रवार, 01 मई 2026

वैशाखी पूर्णिमा
अपरा एकादशी

बुधवार, 13 मई 2026

अपरा एकादशी
शनि जयंती

शनिवार, 16 मई 2026

शनि जयंती
निर्जला एकादशी

गुरूवार, 25 जून 2026

निर्जला एकादशी
ज्येष्ठ पूर्णिमा

सोमवार, 29 जून 2026

ज्येष्ठ पूर्णिमा
योगिनी एकादशी

शुक्रवार, 10 जुलाई 2026

योगिनी एकादशी

संग्रह